2010

कान नाक घसा तपासणी शिबिर, माणिक बाग पूणे (०३-१२-२०१०)

प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराजांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज सेवा परिवारा तर्फे शुक्रवार दि. ०३-१२-२०१० रोजी सांईनगर, माणिक बाग, सिंहगड पुणे येथील श्री दत्त मंदिरात कान, नाक, घसा तपासणी शिबिर आयोजीत केले गेले. या शिबिरात सुप्रसिध्द कान, नाक, घसा तज्ञ डॅा. सचिन मेहता (MBBS, DLO) आणि त्यांच्या पत्नी सौ. धनश्री मेहता यांनी दु. १० वाजल्यापासून, ११० लोकांच्या कान, नाक, घसा यांच्या विषयींच्या तक्रांरींची तपासणी केली व रुग्णांना अधिक तपासणी करून घणे, शस्त्रक्रिया, श्रवणयंत्र वगैरे विषयी योग्य मार्गदर्शन केले. सुटीचा दिवस नसतांना पण लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. शिबिरा बद्दल स्थानिक लोकांनी समाधान व्यक्त केले.

डॅा. सचिन मेहता आणि सौ. धनश्री मेहता यांचे संस्था मनापासून आभार मानते.