2010

कान नाक घसा तपासणी शिबिर, आळंदी (०१-१२-२०१०)

कार्तिक महिन्यातील आळंदी यात्रेचे औचित्य साधून, प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज सेवा परिवार व जगत क्लिनिक आळदी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ०१-१२-२०१० रोजी जगत क्लिनिक आळदी येथे कान, नाक, घसा तपासणी शिबिर आयोजीत केले गेले. या शिबिरात सुप्रसिध्द कान, नाक, घसा तज्ञ डॅा. सचिन मेहता (MBBS, DLO) आणि त्यांच्या पत्नी सौ. धनश्री मेहता यांनी दु. १२ वाजल्यापासून, ९० लोकांच्या कान, नाक, घसा यांच्या विषयींच्या तक्रांरींची तपासणी केली व रुग्णांना अधिक तपासणी करून घणे, शस्त्रक्रिया, श्रवणयंत्र वगैरे विषयी योग्य मार्गदर्शन केले. आळंदी यात्रे मुळे लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. तसेच आळंदीला आलेल्या वारक-याना सेवा परिवारातर्फे झंडुबामची बाटली भेट म्हणून देण्यात आली. शिबिरा बद्दल स्थानिक लोकांनी समाधान व्यक्त केले.

डॅा. सचिन मेहता आणि सौ. धनश्री मेहता यांचे संस्था मनापासून आभार मानते.