2010

फणसराई गावाला भेट (२१-११-२०१०)

प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज सेवापरिवाराच्या सदस्यांनी पुणे जिल्ह्याती मावळ तालुक्यामधील फणसराई गावाचा विकासाचे कार्य चालू ठेवलेले आहे, व त्याचाच एक भाग म्हणून सेवापरिवाराच्या सदस्यांनी दि. २१-११-२०१० रोजी आपल्या लहान मुलांसहित फणसराई गावास भेट दिली व त्याभेटीमध्ये सदरील गावातील ग्रामस्थांना सेवापरीवाराच्या वतीने दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंबरोबरच तेल, तुप, मसाल्याचे पदार्थ इत्यादींचे वाटप करण्यात आले.

त्या दिवशी सेवापरिवाराच्या सदस्यांनी संपूर्ण दिवस फणसराई गावातील ग्रामस्थांबरोबर घालविला व ग्रामस्थांबरोबर आपली ओळख करुन त्यांचे प्रश्न, गरजा, अडचणी इत्यादी समजावुन घेतल्या. संस्थेतर्फे गावातील लहान मुलांना चेंडू, तसेच बिस्किट, मिठाई इत्यादी गोष्टी भेट दिल्या, ती पाहून गावातील तरुण व लहान मुले अत्यांनदीत होऊन सदस्यांच्या मुलांबरोबर मनसोक्त खेळली.

सेवापरिवाराच्या वतीने ग्रामस्थांना प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज यांचे फोटो दिले व श्री काका महाराज यांच्या फोटोची पूजा करण्याचे व त्यांच्यावर श्रध्दा ठेवण्यास सांगितले.