2010

दिवाळी निमीत्य फणसराई गावाला भेट (३१-१०-२०१०)

प. पू. सद्गुरू श्री काका महाराज सेवा परिवार यांनी पुणे जिल्हातील मावळ तालुक्यातील लोणावळा जवळील फणसराई हे गांव दत्तक घेतलेले आहे. या दिवाळीच्या सणानिमित्त प. पू. सद्गुरू श्री काका महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, सदरील प. पू. सद्गुरू श्री काका महाराज सेवा परिवाराव्दारा फणसराई गावातील नागरीकांना, साबण, कपडे धुण्याची पाऊडर, प्रथमोपचार पेटी, आरसे, सर्व वयोगटातील नागरीकांना घालावयास कपडे, ब्लँकेट्स, चटया इत्यादी दैनंदीन उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

सदरील वस्तूंव्यतीरीक्त सदरील परीवारा तर्फे दिवाळीसणा निमित्त मिठाई व फराळाचे देखील वाटप करण्यात आले. वास्तविक फणसराई गावामधील नागरीकांना दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी काहीही नसल्या मुळे त्याना दिवाळी या सणाची तारीख देखील माहीती नव्हती. तथापी सदरील परिवारामधील पदाधिका-यांच्या भेटीमूळे गावातील नागरीकांना सदरील प. पू. सद्गुरू श्री काका महाराज सेवा परिवारा बद्दल आदर वाटू लागला, की ज्यांच्यामुळे गावातील नागरीकांना दिवाळीचा सण साजरा करता आला.

सर्व नागरीकांनी वर उल्लेख केलेल्या कार्यासाठी कपडे, ब्लँकेट्स इत्याद वस्तू दिल्या तसेच ज्या नागरीकांनी देगण्या दिल्या, त्या बद्दल प. पू. सद्गुरू श्री काका महाराज सेवा परिवार आभारी आहे. भविष्यात देखील फणसराई व या सारख्या अनेक परिसरात प. पू. सद्गुरू श्री काका महाराज सेवा परिवार, जीवनावश्यक गोष्टी देऊन मदद करणार आहे.