2010

गरजूंसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीरा (२८-०२-२०१०)

प. पू. सद्गुरू श्री काका महाराज यांच्या आशीर्वादानी, ठरल्या प्रमाणे दि. २८-०२-२०१० रोजी कर्वेनगर येथील वडार वस्तीत गरीब आणि गरजू लोकांसाठी, न्यासातर्फे "मोफत नेत्र तपासणी शिबीराचे" आयोजन करण्यात आले. सुमारे २०० लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. कर्वेनगर परिसरातील श्री सांईबांबाच्या मंदिरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डोळे तपासणी बरोबरच न्यासा तरफे स्वस्तदरात चश्मे सुध्दा उपल्बध करण्यात आले

या शिबिराला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे ह्या शीबीराचे आयोजन पुन्हा लवकरच करावे असा निर्णय पण घेण्यात आला. शीबिरासाठी लॉयन्स क्लब व नेत्रतज्ञ डॉ. सौ. वैभवी रावळ ह्यांची मोलाची साथ लाभली.