2020

मकरसंक्रांतीला तिळगुळ वाटप (२०२०)

प.पू.सद्गुरू श्रीकाका महाराज म्हणतात, दुस-याच्या चेह-यावरचा आनंद बघून जो आनंद होतो तोच खरा आनंद असतो.

प.पू श्रीकाका महाराजांच्या या शिकवणीतूनच दर वर्षी विविध वृध्दाश्रमांतून, अनाथाश्रमातून संक्रांत सणां निमीत्य, संस्थेतर्फे तिळगुळ, वितरण करून सर्वांबरोबर आनंद साजरा करण्यात येतो. या वर्षीही, म्हणजे २०२० च्या मकरसंक्रांतीला पुणे, चापडी, फणसराई, नागपूर व मुंबई इ. विविध वृध्दाश्रमांतून, अनाथाश्रमातून तिळगुळ वाटपा सोबत धान्य, सायकली, दिन-दर्शीका ई. वस्तूंचे वितरण करण्यात आले व सर्वांसह संक्रांतीचा आनंद साजरा करण्यात आला. याशिवाय, जिथे जिथे संस्थेतर्फे प.पू.श्रीकाका महाराजांचा सत्संग चालविण्यात येतो तिथेही तिळगुळ वाटप करण्यात आले.