2020

नवीन कपडे वाटप, बालसदन , काटोलरोड, नागपूर (२६.०१.२०२०)

आपली संस्था,प.पु.सद्गुरूनाथ श्री काका महाराज (श्री. श्रीपाद अनंत वैद्य) सेवा परिवार, पुणे ह्याच्या नागपूर शाखेतर्फे "मानवसेवा हीच ईश्वरसेवा" ह्या श्री सद्गुरुंच्या विचारधारेला अनुसरून बालसदन , काटोलरोड, नागपूर येथे आज २६.०१.२०२० रोजी नवीन शर्ट चे सर्व मुलांना व तेथील कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले. तसेच सोबत तिळगुळ लाडू व चिवडा ह्याचेही वाटप करण्यात आले.

तसेच शर्ट साठी लागणारा पूर्ण खर्च ही त्यांनीच दिला. तेथील मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अविस्मरणीय होता . हे अतिशय आनंदाचे क्षण ज्यांच्या प्रेरणेने आम्हाला पण अनुभवता आले. श्री व सौ पावनिकर ह्या दाम्पत्याचे विशेष आभार