2011

मोफत आरोग्य, नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, चिटणवीसपूरा नागपूर (२१-०८-२०११)

मानवसेवा हिच खरी ईश्वर सेवा, हे बोधवाक्य समोर ठेवून गरीब व गरजू नागरीकांना मदत करण्याचे काम चालू ठेवीत प. पू. श्रीकाका महाराज सेवा परीवाराच्या वतीने दिं – २१-०८-२०११, रोजी महाराष्ट्रातील नागपूर येथील चिटणवीस पुरा येथे मोफत आरोग्य तपासणी व डोळे तपासणी शिबीर तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आला. अशा प्रकारचे ट्रस्टच्या वतीने नागपूरमध्ये घेण्यात आलेले हे तीसरे शिबीर होते व त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला.

सदर विभागातील नामवंत फिजीशियन डॅा. सौ. हर्षा वैद्य व डॅा. सौ. अशविनी बूधे, यांनी महात्मे हॅास्पिटलच्या डॅाक्टरांबरोबर मोफत सल्ला तसेच मोफत औषधे अंदाजे २०० पेक्षा जास्त रुग्णांना दिली. वरील तपासण्यां बरोबरच सदरील शिबीरा मध्ये मोफत रक्त शर्करा व रक्त दाब इत्यादींच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या.

जवळपास १९ रूग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अगदी दुस-या दिवशी महात्मे आय बँक व हॅास्पिटलच्या साह्याने केल्या गेल्या.

सदरील शिबिराला महाल विभागातील नागरीकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामूळे परिवारातर्फे भविष्यात सदरील विभागामध्ये अशाच प्रकारची शिबिरे घेण्याचे ठरविलेले आहे. प. पू. सद्गुरूनाथ श्री. काका महाराज सेवापरिवारा, डॅा. सौ हर्षा वैद्य, डॅा. सौ अश्विनी बुधे व महात्मे आय बँक व हॅास्पिटलच्या यांचे शिबिरासाठी दिलेल्या योगदानासाठी आभार मानत आहे.