2013

श्रीदत्तजयंती, प.पू. श्रीकाका महाराजांचा जन्मदिन त्यानिमित्त उपक्रम

लोककल्याणासाठी अखंड झिजणा-या प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराजांचा जन्मदिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा , म्हणजेच श्रीदत्तजयंतीचा दिवस……..!! जनकल्याणाचं अखंड व्रत घेतलेल्या , सतत सर्वांना भरभरून देणा-या , “ सतत दुस-याच्या आनंदाचा विचार करा ” असं सांगणा-या श्रीमहाराजांच्या जन्मदिनानिमित्त , डिसेंबर महिन्यात संस्थेनी चार ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन केलं.

दि. १ डिसेंबर २०१३ ला नागपूरमध्ये ‘बालसदन’ या अनाथाश्रमात आणि ‘मातोश्री’ या व्रुध्दाश्रमात , अशा दोन ठिकाणी सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं.

दि. ७ डिसेंबर २०१३ ला , मुळशीच्या ताम्हिणी भागातल्या ‘विंझाई हायस्कूल’ इथे सर्वसाधारण आरोग्य तपासणी आणि दंतचिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं.

दि. १५ डिसेंबर २०१३ ला , हडपसर इथल्या ‘आनंददायी’ या लहान मुलांच्या आश्रमात सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं.

या सर्व शिबिरांसाठी , डॉ. हर्षा वैद्य , डॉ. अश्विनी बुधे , डॉ. सतीश कळसकर , डॉ. शिंदे यांनी सहकार्य केलं

या शिबिरांबरोबरच , श्रीमहाराजांच्या भक्तपरिवारातील बालचमू आणि युवावर्गानी , श्रीमहाराजांना एक अल्पशी भेट म्हणून , हडपसर इथल्या ‘आनंददायी’ या लहान मुलांच्या आश्रमात आणि ताम्हिणी भागातल्या ‘विंझाई हायस्कूल’ मधल्या वसतीग्रुहात ब्लैंकेट्स आणि तिथल्या शाळांमधे लेखनोपयोगी साहित्याचं वाटप केलं. बालचमू आणि युवावर्गाच्या या उपक्रमातून श्रीमहाराजांच्या शिकवणीचाच प्रत्यय आला.