2009

वृद्धाश्रमात सत्संगाचे आयोजन

गेल्या काही महिन्यांपासून न्यासाने एक नविन, अपूर्व असा उपक्रम हाती घेतला आहे. विविध वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी न्यास सत्संगाचे आयोजन करत आहे. पुण्यातील काही सुपरिचित वृद्धाश्रमांमधून हा उपक्रम राबवला जात आहे.

त्या पैकी एक म्हणजे, पर्वती भागातील 'पुणे महिला मंडळ' चालवित असलेले वृद्धाश्रम. यातील ज्येष्ठ महिलांसाठी आठवड्यच्या एका वारी सत्संगाचे आयोजन केले जाते. या सत्संगाला आतिशय चांगला प्रतिसाद आहे. सत्संगात प. पू. सद्गुरू श्री. काका महाराज़ाची शिकवण, त्यांच्या प्रवचना मधील विचार, ज्येष्ठ व्यक्तीं पर्यत पोहोचवून त्यांना आनंद मिळावा व त्याना मानसिक खंबीरता यावी ह्या उदद्त हेतूने न्यास काम करत आहे.