2013

सत्संग, नागपूर. (२०-०१-२०१३)

आयुष्य अमूलाग्र बदलून टाकणारे, आयुष्याला एक सकारात्मक दिशा देणारे आणि मनुष्याला आनंदी व निर्भीड बनवणारे, प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महराजांचे अमृतमयी विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी संस्था विविध ठिकाणी सत्संगाचे आयोजन करत आहे.

या उपक्रमाअंतर्गतच नागपूरमध्येही संस्थेतर्फे सत्संगाचं आयोजन केलं जातं. दर रविवारी सायंकाळी हिवसेवाडा, नागपूर येथे, प.पू.श्रीकाका महाराजांच्या सी.डी.द्वारे सत्संग घेतला जातो.

परंतु २० जानेवारी २०१३ ला जो सत्संग झाला त्याला सोन्याची झळाळी प्राप्त झाली. प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराजांच्या पावन सान्निध्यात हा सत्संग मोठ्या उत्साहात पार पडला. स्वतः प.पू.श्रीकाका महाराजांनी आपल्या ओघवत्या रसाळ वाणीतून उपस्थित लोकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या सत्संगासाठी श्रीकाकासांईपरिवारातले,पुण्याहून ३० जण तर काही जण मुंबईहून नागपूरमध्ये दाखल झाले होते. प.पू.श्रीकाका महाराजांच्या पुणे, मुंबई आणि नागपूरच्या भक्तगणांचा मेळावाच जमला होता. हा आनंदसोहळा खूप उत्साहात आणि आनंदात पार पडला. जय सांईराम.