2014

आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर , नागपूर ( २३-०३-२०१४ व ३०-०३-२०१४ )

 

मागोवा

 
 
दीपावलीनिमित्त दिवाळी फराळ आणि जीवनोपयोगी वस्तूंचं वाटप

प. पू. श्रीकाका महाराज म्हणतात, “दुस-याच्या चेह-यावरचा आनंद पाहून आपल्याला आनंद झाला पाहिजे. आपल्या बरोबरच दुस-याचाही विचार प्रत्येकानी केला पाहीजे.”

ही शिकवण डोळ्यापुढे ठेवून, आपला आनंद जास्तीत जास्त लोकांमधे वाटण्यासाठी, संस्था विविध सण विविध लोकांसमवेत साजरा करते. या वर्षीही दीपावलीच्या निमित्तानी दिवाळी फराळ आणि भेटवस्तूंचं विविध ठिकाणी वाटप करण्यात आलं.

  1. श्रीसांईमंदिर, कर्वेनगर, पुणे.

  1. सांईनगर, माणिकबाग, पुणे.

  1. शाहू कॉलनी, कर्वेनगर, पुणे.

  1. दत्तवाडी, सिंहगड रस्ता, पुणे.

  1. मातृकुल वृध्दाश्रम, पर्वती पायथा, पुणे.

  1. हिवसेवाडा, चिटणीसपूरा, नागपूर.

  1. मातोश्री व्रुध्दाश्रम , नागपूर

  1. अर्पण आश्रम , पुणे

  1. भूगाव , पुणे

  1. अभ्यासिका, महर्षिनगर, पुणे

  1. विंझाई हायस्कूल, मुळशी, पुणे

  1. शंभूराजे प्रतिष्ठान आश्रम, हडपसर, पुणे

 1. डा.भीमराव गस्ती उत्थान संस्था, बेळगाव
 2. नांदेड

इत्यादी ठिकाणी दिवाळी फराळ आणि भेट्वस्तूंचं वाटप करण्यात आलं.

त्याच बरोबर डा. भीमराव गस्ती उत्थान , बेळगाव या संस्थेतल्या ४०० विद्यार्थिनींसाठी पेन, पेन्सिल, रिफिल्स, खोडरबर, टोकयंत्र इत्यादी शैक्षणिक साहित्याची मदतही करण्यात आली.

वस्तू वाटप वाल्मीकि बालगृह, नागपूर (२१-०९-२०१४)

संस्थेतले बरेच सदस्य प.पू.श्रीकाका महाराजांची शिकवण जास्तीत जास्त अंगी बाणवून त्यानुसार मार्ग चालण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतात. प.पू.श्रीकाका महाराजांच्या शिकवणीला अनुसरून काही सदस्यांनी आ‍गस्ट आणि सप्टेंबर मधे वाढदिवसांच्या निमित्तानी , नागपूरम्धल्या अभयनगर येथील बालग्रुह या अनाथाश्रमात दैनंदिन गरजेच्या वस्तू जसे, बाद्ल्या, अंघोळीचा साबण, टूथपेस्ट इत्यादींचं वाटप केलं. आणि एक संपूर्ण दिवस त्या आश्रमातल्या मुलांबरोबर घालवून वाढदिवस साजरा केला.

याशिवाय VNIT मधल्या प्रो.महाजन यांचे व्याख्यान आयोजित केले होते. महाजन सर यांनी तिथल्या मुलांना वेळेचं महत्व पटवून सांगितलं. तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी यशाचं तंत्र समजावून सांगितलं. त्याच बरोबर त्यांनी स्वतः लिहिलेलं "how to clear exams" हे पुस्तक इयत्ता आठवी आणि त्या वरील इयत्तांच्या विद्यार्थ्यांना वाटलं.

मोफत आरोग्य तपासणी शिबिर – टिळक नगर, नागपूर (१४-०९-२०१४)

दि.१४-०९-२०१४ ला नागपूर्मधल्या टिळकनगर येथे संस्थेतर्फे एका मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. अंदाजे १०० लोकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आणि मोफत औषधे वाटण्यात आली.

या शिबिरासाठी डा.हर्षा वैद्य, डा.अश्विनी बुधे आणि त्यांच्या सहका-यांनी मोलाचे योगदान दिले.

मोफत आरोग्य तपासणी शिबिर – धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान अनाथाश्रम (०३-०८-२०१४)

दि.०३-०८-२०१४ ला संस्थेतर्फे , हडपसर येथील शंभूराजे प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणा-या आश्रमात एका आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. सुमारे १०० मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आणि मोफत औषधेही वाटण्यात आली. डा.शिंदे आणि त्यांच्या सहका-यांनी या शिबिरासाठी मोलाचे योगदान दिले.

मोफत आरोग्य तपासणी शिबिर – ’माझे माहे” मुलींचे वसतीग्रुह , मुंबई (०६-०७-२०१४)

आपल्या कार्याच्या कक्षा रुंदावताना , संस्थेनी मुंबईत प्रथमच एका आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं. ’माझे माहेर’ या मुंबईतल्या अनाथ मुलींच्या वसतीग्रुहात हे शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात सर्व औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. या शिबिरात १०० मुलं व मुलींची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. डा. अश्विनी बुधे यांनी बहुमूल्य योगदान दिले.

कपडे वाटप नागपूर (२९-०६-२०१४)

अन्न , वस्त्र, निवारा ह्या मनुष्याच्या प्राथमिक गरजा आहेत. पण दुर्दैवानी अशी असंख्य माणसं आहेत ज्यांना ह्या प्राथमिक गरजांपासूनही वंचित राहावं लागतं. अशा काही गरजू लोकांना शक्य ती मदत संस्था करत असते. त्या उद्देशांतर्गत जुने परंतु सुस्थितीतले कपडे गोळा करून गरजूंना वाटण्याचा उपक्रम संस्था वेळोवेळी राबवत असते.

असाच एक कपडे वाटपाचा उपक्रम हिवसेवाडा, नागपूर येथे दि.२९-०६०२०१४ ला संस्थेतर्फे राबवण्यात आला. यात ७५ पेक्षा जास्त गरजूंनी लाभ घेतला.

शालेय वस्तू वाटप पूणे (२८-०६-२०१४)

दर वर्षीप्रमाणे या वर्षीही संस्थेतर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या व इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. प.पू.श्रीकाका महाराजांच्या सांईमंदिरात हा कार्यक्रम पार पडला.

प.पू.श्रीकाका महाराज वारंवार शिक्षणाचं महत्व लोकांना पटवून देत असतात. ते म्हणतात की , स्वतःच्या आणि देशाच्याही प्रगतीसाठी प्रत्येकानी शिकलं पाहिजे. यासाठीच संस्थेतर्फे प्रतिवर्षी हा उपक्रम राबवला जातो, ज्यायोगे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत होते आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळतं.

उत्तीर्ण विद्यार्थिनचे अभीनंदन (२०१४)

प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज नेहमी म्हणतात की , आजच्या काळात शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. शिक्षणाचं महत्व लक्षात घेऊन संस्थेनी , गरीब व गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शक्य ती मदत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी , विंझाई हायस्कूल , ताम्हिणी आणि आनंददायी शाळा , हडपसर इथे संस्था प्रति महिना धान्य , भाजी तसेच वैद्यकीय मदत करण्याचे कार्य करत आहे. त्याचप्रमाणे , बेळगाव येथील देवदासी मुलींच्या उत्थान संस्थेशीही संस्था मदत कार्याच्या माध्यमातून जोडली गेली आहे.

या ’उत्थान’ मधल्या १६३ देवदासी मुली १२वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत, आणि त्यापैकी ४८ मुलींना ८०%पेक्षा जास्त गुण मिळाले, तर १९४ मुली १०वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत, व त्यापैकी ११५ मुलींनी ८०% पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.

त्याचप्रमाणे , विंझाई हायस्कूल या शाळेचा १०वी चा निकाल १००% लागला आहे. या शाळेतल्या ८ विद्यार्थ्यांना ८०% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. ही शाळा तलुक्यात अग्रगण्य ठरली आहे

या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचं संस्थेकडून हार्दिक अभिनंदन..! या विद्यार्थांचं कौतुक करण्याकरता संस्था लवकरच एक कार्यक्रम आयोजित करणार आहे. प.पू.श्रीकाका महाराजांची क्रुपा अशीच सर्वांवर सदैव राहो.

आमच्या या उदात्त कार्यात आपणही जोडले जाऊ शकता. संस्थेला मदत करण्याकरता संस्थेच्या संपर्क क्रमांकांवर किंवा संकेत स्थळावर संपर्क करू शकता.

वारकर बंधू भगीनींन करीता मोफत आरोग्य तपासणी शिबिर, बिबवेवाडी, पूणे (२२-०६-२०१४)

दि. २२-०६-२०१४ रोजी प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज सेवा परिवार, पूणे यांच्या वतीने बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हान शाळेमध्ये मुक्कामी असलेल्या – श्री संत श्रेष्ट जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान सोनखेड व परिसर, वारकरी बंधू भगीनींची तज्ञ डाक्टरांकडून आरोग्य तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात आले.

डा. सतिश कळसकर, डा. शिंदे, डा. अश्विनी बूधे आणि त्यांचे सहकारी यांनी आपले महत्वाचे योगदान दिले. या प्रसंगी सेवा परिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी १० ते दु. ४ या वेळात ६४७ वारलरी बंधू भगीनींनी याचा लाभ घेतला.

मोफत आरोग्य तपासणी शिबिर, मानवसेना नगर सेमीनरी हिल्स, नागपूर, (०१-०६-२०१४)

प.पू.सद्गुरूनाथ श्री काका महाराजांच्या मार्गदर्शनाखाली, दि. ०१-०६-२०१४ रोजी संस्थेनी मानवसेना नगर सेमीनरी हिल्स, नागपूर या वस्ती मधे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले.

७५ पेक्षा जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यात मोठ्यांबरोबर लहानांचाही समावेश होता. मोफत चिकित्सेबरोबर मोफत औषधांचेही वाटप करण्यात आले. प्रसिध्द डाँ. अश्वीनी बूधे यांनी या शिबिरासाठी केलेल्या योगदानासाठी संस्था त्यांची आभारी आहे.

मोफत आरोग्य तपासणी शिबिर, अमृतनाथ स्वामी महाराज आश्रम, आळंदी (२४-०५-२०१४)

मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदवाक्याला अनुसरून प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज सेवा परिवाराच्या वतीने, दि. २४ मे २०१४ रोजी , अमृतनाथ स्वामी महाराज आश्रम, चाकण रोड, आळंदी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास स्थानिक तसेच एकादशीच्या निमित्ताने आळंदीला आलेल्या वारकर्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला

सकाळी १० वाजल्यापासून शिबिराला सुरुवात झाली. सुमारे २०० लोकांनी या सेवेचा लाभ घेतला. शिबिरार्थींना, प.पू. श्रीकाका महाराजांवर रचलेल्या नित्यपाठ या ओवीबध्द पुस्तकाचे वाटपही करण्यात आले.

डॅा. शिंदे व डॅा. अश्विनी बूधे यांचे संस्था मनापासून आभार मानते.

संस्थेतर्फे पाणपोई , ताम्हिणी , मुळशी. (२७-०४-२०१४)

प.पू. सद्गुरू श्रीकाका महाराजांच्या दूरदर्शी आणी दयार्द्र द्रुष्टीकोनातून आणि त्यांच्याच प्रेरणेनी , ताम्हिणीतल्या विंझाई शाळेजवळ संस्थेतर्फे एका पाणपोईची योजना करण्यात आली. ३०० लिटरची एक टाकी विंझाई शाळेजवळ असलेल्या एका झाडाच्या गर्द सावलीत बसवण्यात आली. दि. २७-०४-२०१४ या दिवशी संस्थेच्या काही सदस्यांनी ताम्हिणीला भेट देऊन या पाणपोईची व्यवस्था केली. या पाणपोईमुळे , भर उन्हाळ्यातही ताम्हिणीतल्या वाटसरूंसाठी पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.

 
कपडे व वाटप शिबिर, नागपूर ( ०७-०४-२०१४ व ११-०५-२०१४)
 

७-०४-२०१४ रोजी, श्री मीलींद लाबडे यांच्या साह्याने, बाल सदन आश्रमास, संस्थेने नवीन सी. एफ. एल बल्ब लाऊन दिले. या मूळे आश्रमाचा वीजेचा खर्च कमी होणार आहे, तसेच त्या मूलांच्या जीवनात एका नवीन प्रकाशाचा तो संकेत आहे

तसेच दि.११-०५-२०१४ रोजी, संस्थेच्या नागपूरमधल्या सभासदांनी, नागपूर इथल्या हिवसे वाड्यात गरजू, वृध्द नागरीकांना कपडे वाटप केलं. नागपूरमधल्या रस्त्यांवरून एक रॅली काढून रस्त्यांवर राहणार्या गरीब व गरजू लोकांनाही कपडे वाटप केलं. वेळोवेळी संस्थेनी सभासदांना तसंच प.पू.श्रीकाका महाराजांच्या भक्तांना आव्हान केलं होतं. आणि त्यानुसार जुने परंतु सुस्थितीले कपडे गोळा करण्याचं काम चालू आहे. अशा असंख्य गरजू लोकांसाठी ब्लॅंकेट्स, साड्या, शर्ट्स इ. कपड्याची आवश्यकता आहे. अशा लोकांचा शोध घेऊन संस्था त्यांना कपड्याच्या स्वरूपात मदत करण्याचं कार्य करत असते. पुणे, नागपूर बरोबरच महाराष्ट्रात इतर ठिकाणीही अशा लोकांचा शोध घेऊन त्यांना मदत पुरवण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

या कार्यक्रमात श्रीमती हिवसे काकू, सौ. रूची हिवसे व सौ. हर्षा वैद्य यांचे मोलाचे योगदान लाभले.

आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर , नागपूर ( २३-०३-२०१४ व ३०-०३-२०१४ )

संस्थेच्या नागपूर शाखेच्या कार्यात सक्रीय सहभागी असणारे , आणि संस्थेच्या कार्यात बहुमोल योगदान देणारे कै.श्री.हिवसे काका यांच्या स्म्रुतीप्रित्यर्थ संस्थेनी नागपूर येथे दोन आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन केलं.

दि. २३ मार्च २०१४ या दिवशी रक्तदान शिबिराचं आयोजन संस्थेनी केलं. या शिबिरात ४० जणांनी रक्तदान केलं.

दि. ३० मार्च २०१४ या दिवशी एका मोठ्या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन संस्थेनी केलं. या शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणी , रक्तातील साखर तपासणी , दंतचिकित्सा , नेत्र तपासणी इत्यादी विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. ३५० जणांनी या तपासण्यांचा लाभ घेतला. याशिवाय , ५ रुग्णांची नेत्र-शल्यचिकित्सा (सर्जरी) मोफत करण्यात आली

या शिबिरासाठी डा. हर्षा वैद्य , डा. अश्विनी बुधे , डा. महात्मे आणि त्यांचे सहकारी , सिप्ला फार्मास्यूटीकल्स , डा. सूची गुप्ता , डा.हेडगेवार ब्लड बैंक या सर्वांचं मोलाचं सहकार्य लाभलं. संस्था या सर्वांची मनःपूर्वक आभारी आहे.