2014

संस्थेला ’दादासाहेब मनोरे समाजभूषण पुरस्कार’ (०९.०१.२०१४)

आपल्या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन , पुण्यातल्या ’ श्री.दादासाहेब मनोरे प्रबोधिनी’ या संस्थेनी आपल्या संस्थेला सन्मानित केले. पुण्यातल्या टिळक स्मारक मंदिरात , दि.९ जानेवारी २०१४ च्या दिवशी, सायंकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला. ’दादासाहेब मनोरे समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून आपल्या संस्थेच्या कार्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. रुपये ११०००/- आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आपल्या संस्थेच्या वतीने , संस्थेचे खजिनदार श्री.संजय सरपाले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. संस्थेचा हा पहिलाच पुरस्कार आहे , अवघ्या ४ वर्षात संस्थेला मिळालेल्या या पुरस्कारामुळे संस्थेच्या सर्व सदस्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.