2015

धर्मार्थ दवाखान्याचं उद्घाटन (३०-१२-२०१४)

गरीब आणि गरजू लोकांना आरोग्य तपासणी सुविधा आणि औषधोपचार मोफत उपलब्ध व्हावा ही प.पू.श्रीकाका महाराजांची तळमळ आहे. आणि त्यांच्याच इच्छेनुसार या दिशेनी पहिलं पाऊल संस्थेनी टाकलं आहे. दर रविवारी सायंकाळी ६ वाजता हिवसेवाड्यात गरजू लोकांना मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध केली आहे. डा. हर्षा वैद्य आणि डा. अश्विनी बुधे यांच्या सहकार्यानी हा धर्मार्थ दवाखाना चालविण्यात येणार आहे.

दि. ३० डिसेंबर २०१४ या दिवशी स्वतः प.पू.श्रीकाका महाराजांच्या हस्ते या दवाखान्याचं उद्घाटन झालं.