2016

कपडे वाटप- फणसराई व उदेवाडी (२३-०४-२०१६)

प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराजांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेनी लोणावळ्याजवळील फणसराई व उदेवाडी या आदिवासी वस्त्यांच्या विकासाचं काम हाती घेतलं आहे. संस्थेचे सभासद नियमितपणे तिथे भेट देऊन तिथल्या लोकांना शक्य ती मदत देत असतात.

दि. २३-०४-२०१६ रोजी संस्थेच्या काही सभासदांनी फणसराई व उदेवाडी या दोन्ही वस्त्यांना भेट दिली. तिथल्या आदिवासी लोकांना कपडे व धान्य वाटप करण्यात आले. तसेच लहान मुलांना गोळ्यांची पाकीटे, बिस्कीटांचे पुडे इ. खाऊ वाटण्यात आला. त्या लोकांबरोबर चहापान करून व त्यांच्याशी संवाद साधून सर्वांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व शक्य त्या मदतीचे आश्चासन दिले.