2016

मकर संक्रत साजरा, पूणे व नागपूर (२०१६)

’मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीद असणारे प. पू. सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज नेहमी सांगतात की , “ दुस-याच्या चेह-यावरचा आनंद पाहून आपल्याला आनंद झाला पाहिजे. प्रत्येकानी स्वतःबरोबर दुस-याचाही विचार केला पहिजे.” त्यांच्या या शिकवणीनुसार आणि त्यांच्याच प्रेरणेने व प्रोत्साहनाने मकर संक्रांत आणि दीपावली या दोन सणांना संस्थेतर्फे विविध ठिकाणी तीळगुळ आणि दिवाळी फराळ तसेच भेटवस्तू यांचं वाटप केलं जातं. या वर्षीही मकर संक्रातीच्या निमित्ताने सेवापरिवारातर्फे तिळगुळ व प.पू.श्रीकाका महराजांचा संदेश असलेल्या शुभेच्छापत्रांचे वाटप करण्यात आले. या शुभेच्छापत्रांचे वैशीष्ट्य म्हणजे त्यावर प.पू.श्रीकाका महाराजांच्या संदेशासह त्यांची स्वाक्षरी आहे…!!

संस्थेतर्फे पुण्यात, नागपूरमधे व नांदेड इथे ज्या ज्या ठिकाणी सत्संगाचे आयोजन केले जाते त्या प्रत्येक ठिकाणी, आणि त्याव्यतिरिक्त खालील ठिकाणी हे वाटप करण्यात आले.

“ तिळगुळ घ्या, गोड बोला ” असे म्हणून ,’ जय सांईराम ’ या परवलीच्या शब्दानी या तिळगुळ वाटपाचा आनंद सर्वांबरोबर वाटण्यात आला.