2017

मोफत आरोग्य तपासणी व रक्त्दान शिबिर नागपूर (२६-०१-२०१७)

'प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज (श्री. श्रीपाद अनंत वैद्य) सेवा परिवार'  व बारई समाज, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे एक बहुतपासण्या असलेले आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन स्वतः प.पू.श्रीकाका महाराज यांच्या शुभहस्ते झाले.

या शिबिरात सुमारे 300 रुग्णांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

या शिबिरासाठी डॉ. चिराग भोज, डॉ. नेहा लाबडे, डॉ. समीक्षा सहारे, डॉ. आयुषी वैद्य, डॉ. शैलेश कोठारकर, डॉ. विजयलक्ष्मी कोठारकर, डॉ. मोहन नाटेकर, डॉ. हर्षा वैद्य, डॉ. अश्विनी बुधे या सर्वांचे बहुमूल्य योगदान लाभले. संस्था या सर्वांची मनापासून आभारी आहे