2018

मोफत आरोग्य तपासणी व रक्त्दान शिबिर नागपूर (२८-०१-२०१८)

संस्थेच्या नागपूर शाखेच्या कार्यात सक्रीय सहभागी असणारे, आणि संस्थेच्या कार्यात बहुमोल योगदान देणारे कै.श्री.हिवसे काका यांच्या स्म्रुतीप्रित्यर्थ संस्थेनी नागपूर येथे आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन केलं.
दि. २८ जानेवारी २०१८ या दिवशी एका मोठ्या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन संस्थेनी केलं. या शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तातील साखर तपासणी, दंतचिकित्सा, नेत्र तपासणी इत्यादी विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. ३०० जणांनी या तपासण्यांचा लाभ घेतला. याशिवाय, Central Point Hospital, Nagpur च्या सौजन्याने, मोफत ECG तपासणि करण्यात आली.

या शिबिरासाठी सर्वांचं मोलाचं सहकार्य लाभलं. संस्था या सर्वांची मनःपूर्वक आभारी आहे.