2015

मोफत आरोग्य तपासणी शिबिर, विठ्ठल मंदिर, अचानक चौक, राम नगर, पूणे (०३-०५-२०१५)

मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदवाक्याला अनुसरून प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज सेवा परिवाराच्या वतीने, दि. ०३-०५-२०१५ रोजी , विठ्ठल मंदिर, अचानक चौक, राम नगर, पूणे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला.

सकाळी १० वाजल्यापासून शिबिराला सुरुवात झाली. सुमारे २०० लोकांनी या सेवेचा लाभ घेतला. शिबिरार्थींना, प.पू. श्रीकाका महाराजांवर रचलेल्या नित्यपाठ या ओवीबध्द पुस्तकाचे वाटपही करण्यात आले.डॅा. अश्विनी बूधे यांचे संस्था मनापासून आभार मानते.