आधार।। श्रीसद्गुरवे नमः।।![]() आजच्या गतिशील काळात माणसाला माणसासाठी वेळ नाही. सोशल नेट्वर्किंग साईट्सवर जोडलेला असणारा माणूस कौटुंबिक नातेसंबंधाना दुरावत चालला आहे . कौटुंबिक जीव्हाळल्याला पारख्या झालेल्या अशा वृद्ध नागरिकांना आयुष्याच्या संध्याकाळी जीवन जगण्यासाठी मानसिक बळ मिळावं प्राप्त परिस्थितीला त्यांनी खंबीरपणे सामोरं जावं या हेतूने विविध वृद्धाश्रमांमधुन संस्था सत्संगाचे आयोजन करत आहे . प .पू श्री काका महाराजांच्या सकारात्मक विचारांनी त्यांच्या निराश मनांना उभारी मिळावी यासाठी संस्था सतत प्रयत्नशील आहे . मकर संक्रांतीला तिळगुळ आणि दिवाळीला फराळ आणि भेटवस्तूंसह सणाचा आनंद या आजी आजोबांबरोबर साजरा केला जातो . त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य तपासणी शिबीरांमधून त्यांच्या दुखल्या खुपल्याची आस्थेने विचारपूस केली जाते . या आजी आजोबांच्या वृद्ध नागरिकांच्या रडणाऱ्या मनांना श्री महाराजांच्या अमृतवाणीनी मायेचा ओलावा देऊन मानसिक आधार देण्याचं कार्य संस्था करत आहे . |