सावली।। श्रीसद्गुरवे नमः।।![]() जीवन जगण्यासाठी अनिवार्य असणाऱ्या अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा पण समाजातल्या काही वंचित व मागास भागातील लोकांच्या या प्राथमिक गरजाही पूर्ण होऊ शकत नाही . अशा गरजू लोकांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत तसेच कपडेवाटपही संस्था वेळोवेळी करत आहे . त्याचप्रमाणे या लोकांना प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधाही संस्थेतर्फे उपलब्ध करून दिली जाते. याच उपांतर्गत लोणावळा याजवळील फणसराई या आदिवासी पाड्यातील ७ कुटुंबांना संस्थेनी पत्र्याचे छप्पर असलेली पक्की घरे बांधून दिली आहेत . तसेच बेळगाव इथल्या 'उत्थान" या देवदासी मुलींच्या आश्रमालाही संस्था वेळोवेळी मदत करत आहे . समाजाचंच एक अंग असलेल्या पण समाजापासून दूर राहिलेल्या या घटकाला काही अंशी दिलासा देण्याच कार्य संस्था करत आहे . |